सिध्देश्वर महाविद्यालयाकडून एड्स जनजागृती रॅली
माजलगांव, दि. 2 प्रतिनिधी: भाशिप्र संस्थेच्या येथील सिध्देश्वर महाविद्यालयातील राष्ट्ीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रूग्णालय माजलगांव यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून शहरातील प्रमुख रस्त्यांवर एड्स जनजागृती रॅलीकाढण्यात आली.
समाजामध्ये एड्स या रोगाविषयी जाणीव, जागृती व्हावी तसेच या रोगांबद्दल लोकांच्या मनामध्ये असणा-या शंका – कुशंका यांचे निरसन व्हावे या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. गजानन रूद्रवार यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. यावेळी रूग्णालयातील डाॅ. थावरे, डाॅ. रत्नपारखी, ओ. ए. श्री. जुजगर, प्रयोग शाळा तंत्रज्ञ सय्यद रईस, समुपदेशक शेख नईमोद्दीन, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. युवराज मुळये, प्रा. गंगाधर उषमवार, प्रा. रावई शिंदे, प्रा. जयश्री बनगे, प्रसाद गायकवाड व स्वंयसेवक – स्वयंसेविका उपस्थित होत्या.
काढण्यात आली. 


