*अहवाल*
भा शि प्र संस्था अंबाजोगाई संचलित श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड, प्रमुख पाहुणे प्रा कालिदास चिटणीस, प्राचार्य डॉ महेश देशमुख, उपप्राचार्य डॉ गजानन होन्ना, प्रा युवराज मुळये,प्रा संतोष लिंबकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यास व माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच वैयक्तीक पद्य “विश्व गुरू तव अर्चना मे”हे प्रा अंकुश साबळे यांनी सादर केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय प्रा सविता मद्रेवार यांनी करतांना म्हटले की विशाखा समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गुरुपूजनाचे महत्व ,त्याचे भारतीय संस्कृती मधील स्थान हे सांगणे असा आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा कालिदास चिटणीस यांनी दत्त गुरूंनी केलेल्या चोवीस गुरूंची माहिती गीताद्वारे सादर केली. प्रत्येक शिक्षकांनी ह्या प्रसंगी लक्षात घ्यावं की आपला विद्यार्थी हा उच्च शिक्षित होत तो संस्कारित कसा होईल याचा संकल्प करावा.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष अभय कोकड म्हणाले की,गुरुविना आपल्या आयुष्याला मोक्ष नाही.आजच्या 21 व्या शतकात विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्ये रुजवतांना
गुरुनेही कौशल्य वापरावीत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचे आभार प्रा डॉ प्रेमनंदा घडसिंग यांनी केले.कार्यक्रमाची सांगता डॉ.रमेश गटकळ यांनी पसायदानाने केली.

