माजलगाव – ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय राष्ट्र विकसित होवू शकत नाही.त्यासाठी संपूर्ण जीवन अत्यंत बिकट परिस्थितीतुन वाटचाल करतांना नानाजी देशमुख यांनी भौतिक,आत्मिक व शैक्षणिक विकासाची गरज महत्वाची आहे असे म्हटले असे प्रतिपादन प्रमुख वक्ते लक्ष्मीकांत जोशी यांनी केले.ते श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “आठवणीतील नानाजी” या विषयावरील व्याख्यान प्रसंगी बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ गजानन होन्ना यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना लक्ष्मीकांत जोशी म्हणाले की,डॉ.हेडगेवार यांच्या प्रेरणेतून प्रांतप्रचारक म्हणून कार्य करतांना त्यांनी सामान्यात राष्ट्रभक्ती निर्माण केली.दिनदयाळ शोध संस्थान ,धन्यता अभियान या माध्यमातून नानाजी देशमुख यांनी शिक्षण ,आरोग्य ,कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ गजानन होन्ना म्हणाले की,आपल्या पूर्वजांच्या इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. सर्वस्वाचा त्याग करून नानाजी देशमुख यांनी आदिवासी समाजासाठीचे कार्य , ग्रामविकास प्रकल्प आजही दीपस्तंभासारखे उभे आहेत. त्यांच्या राष्ट्रीय कार्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुनील पाटील ,सूत्रसंचालन निकिता मारगुडे, आरती बोधनकर ,पद्य अन्वी जाधव तर आभार डॉ रमेश गटकळ यांनी मानले. शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
http://www.majalgaonparisar.com/News/Gramswarajya-requires-physical–educational-and-spiritual-development—Laxmikant-Joshi.html