Affiliated Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Accrediated By NAAC Grade 'B'

डिजिटल बोर्ड उदघाटन व शिष्यवृत्ती वितरण सोहळा…

डिजिटल बोर्ड उदघाटन व शिष्यवृत्ती वितरण सोहळा…
श्री सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव व आय डी एफ सी फर्स्ट भारत शाखा माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोप्य महोत्सवी वर्ष 2020 – 2021 निमित्त दि. 16 मार्च 2021 रोजी आय क्यू ए सी विभागाच्या माध्यमातून डिजिटल बोर्ड उदघाटन व शिष्यवृत्ती वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री प्रकाशजी दुगड, अध्यक्ष, स्था. स. समिती, माजलगाव तर उद्घाटक म्हणून मा. प्रा. श्री चंद्रकांतजी मुळे, सहकार्यवाह,भा.शि. प्र. संस्था अंबाजोगाई हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री जॉन पॉल अशोक, आय डी एफ सी, सह सर व्यवस्थापक, सी एस आर विभाग, तामिळनाडू तसेच मा. श्री शरद देडे आयडीएफसी, सि एस आर, महाराष्ट्र, मा. श्री संदीप पवार, शाखा व्यवस्थापक, माजलगाव, मा. श्री अमोल तुळसे, सहा. शाखा व्यवस्थापक, माजलगाव हे होते तर मा. श्री अमरनाथजी खुर्पे, कार्यवाह, स्था. स. समिती, माजलगाव, मा. श्री अभयजी कोकड अध्यक्ष, म. वि.समिती माजलगाव, मा. श्री बाबुरावजी आडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कु. स्नेहा गायकवाड बी. ए. प्रथम वर्ष, कु. छाया चाटे बीएससी प्रथम वर्ष व कु. सुनिता ढगे बी. कॉम. प्रथम वर्ष या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते 5000 रुपये शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली.