पोलीस प्रशासनाचे विद्यार्थिनी कडून कौतुक
माजलगाव प्रतिनिधी 06/12/2019
आज श्री सिद्धेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थिनींनी पोलिस प्रशासनाचे जाहीर कौतुक केले. प्रियंका रेड्डी या उच्चशिक्षित मुलीवर अत्याचार करणाऱ्या चार नराधमांना आज सकाळी पोलीस प्रशासनाने एन्काऊंटर केले. याचा आनंद महाविद्यालयातील सर्व मुलींना झाला व त्या सर्व मुली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एकत्रित येऊन जल्लोष केला. व हैदराबाद पोलिस व पोलिस प्रशासनाचे जाहीर कौतुक केले. समाजामध्ये महिला सुरक्षित असाव्यात असा सर्व मुलींनी मानस व्यक्त केला. या कार्यक्रमास घोष पथक होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भालचंद्र कराड राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व उपप्राचार्य डॉक्टर गजानन होन्ना प्राध्यापक युवराज मुळे डॉक्टर छाया कोदरकर, डॉक्टर सुनील पाटील, डॉक्टर कमलकिशोर लड्डा, प्राध्यापक रावई शिंदे, प्राध्यापक भोले मॅडम,प्रा.गंगाधर उषमवार,प्रा.जीजाराम बागल, प्राध्यापिका पाठक मॅडम व विद्यार्थिनी या करिता उपस्थित होत्या.


