दिनांक 04/02/2020 श्री सिद्धेश्वर महाविद्यालया मधील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जागतिक कॅन्सर दिन साजरा करण्यात आला तसेच सध्या वेगाने पसरत जाणाऱ्या कोरोना बद्दल विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे माहिती सांगितली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य युवराज मूलये सर लाभले
तसेच अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. गजानन होंन्ना सर लाभले आणि त्यांनी विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विभागातील प्राध्यापिका कु. अभिज्ञा भोले या उपस्थित होत्या त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नेहा शेख हिने केले, तसेच कु. प्रगती राठोड आणि कु. रमा घनघाव यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. किरण डाके हिने केले.