श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव च्या वतीने माजलगाव धरणात बुडून मरण पावलेले माजलगाव येथिल प्रसिद्ध डॉ. फपाळ यांच्या शोध मोहिमेकरता कोल्हापूरहून आलेले के.डी.आर.एफ चे जवान राजशेखर मोरे हे शोध मोहीम सुरू असताना शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना श्री सिद्धेश्वर महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून 11657/- रुपयाची आर्थिक मदत मा. तहसीलदार वर्षा मनाळे यांच्याकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश देशमुख, उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना, डॉ. युवराज मुळये, प्रा. लक्ष्मीकांत सोन्नर, स्टाफ सेक्रेटरी डॉ. गंगाधर उषमवार,प्रा. किशोर ठाकूर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.