भारतीय राज्यघटना लोकाभिमुख व्हावी
– प्रा. जिजाराम बागल
——
माजलगांव, दि. 26 प्रतिनिधी: भारतीय राज्यघटना ही लोकांभिमुख व्हावी असे प्रतिपादन प्रा. जिजाराम बागल यांनी व्यक्त केले. सिध्देश्वर महाविद्यालयात राष्ट्ीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभगाच्या वतीने आयोजित संविधान दिन कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थांनी प्रकाश दुगड हे तर अभय कोकड,सुमंत कुलकर्णी, नंदकिशोर भुतडा, प्राचार्य डाॅ. भालचंद्र कराड, उपप्राचार्य प्रा. युवराज मुळये, प्रा. संतोष लिंबकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना प्रा. बागल म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही जगातील एकमेव अशी राज्यघटना आहे की तिथे श्रेष्ठत्व हे लोकांभिमुख आहे. लोकांना महत्व देणारी राज्यघटना आहे. राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असल्याने राज्यव्यवस्थेचे महत्व टिकून आहे. त्यातील मूलभुत अधिकार व कर्तव्य यांची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. त्यामुळेच न्यायालयाचे निर्णय आजही मान्य करावे लागतात. अध्यक्षीय समारोपात प्रकाश दुगड म्हणाले की, संविधानाचे महत्व आपण जोपर्यंत जाणून घेणार नाहीत तोपर्यंत प्रत्येक भारतीयाची प्रगती होणार नाही. संविधानाच्या उद्देशिकेत लोकांभिमुखतेला महत्वाचे स्थान दिलेले आहे. प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. कराड यांनी मानले.सुत्रसंचालन राखी सोनवणे तर आभार अमृत डुकरे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.