ण्याचे महत्त्व जाणा :-
प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड
……………………………………
माजलगाव प्रतिनिधी दिनांक 22 मार्च 2021
पाण्याचे महत्त्व जाणले तरच सजीव सृष्टी टिकेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड यांनी केले. येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री. सिद्धेश्वर महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित जागतिक जल दिन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना हे उपस्थित होते.
तसेच मंचावर वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रेमनंदा घडसिंग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वनस्पती शास्त्र विभागाच्या सहा विद्यार्थिनी याप्रसंगी पाणी समस्येवर आपले विचार मांडले. यामध्ये अनुक्रमे कु. मनीषा काजळे, कु. वृषाली लेंडे, कु. वैष्णवी लकडे, कु. स्वाती लासे, कु. छाया चाटे, कु. ज्ञानेश्वरी डाके या विद्यार्थिनीने आपले विचार मांडले. त्यामध्ये त्या म्हणाले की पृथ्वीवर असलेल्या पाण्याचे प्रमाण, पाण्याचे रासायनिक गुणधर्म, पाण्याचा वापर, पाण्याचा होणारा अपव्यय, पाण्याचे प्रदूषण, पाणी नसेल तर निर्माण होणाऱ्या समस्या या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड म्हणाले की पाणी हे पृथ्वीवरील अमृत आहे. पाण्याविना सर्व सृष्टी नाहीशी होईल त्यामुळे पाण्याचे महत्त्व जाणून त्याचा योग्य वापर व जतन केले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन उपप्राचार्य डॉ. गजानन होंन्ना, यांनी केले तर आभार वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रेमनंदा घडसिंग यांनी मांनले. या कार्यक्रमास वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी कोरोणा विषयक नियमांचे पालन करून उपस्थित होते.