सिद्धेश्वर महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न
माजलगाव प्रतिनिधी दिनांक 6 12 2019
येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एचडीएफसी ब्लड बँक माजलगाव, न्यू लाईफ ब्लड बँक परभणी व ग्रामीण रुग्णालय माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूजनीय भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय अमरनाथजी खुर्पे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभयजी कोकड, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाशजी दुगड, शिशुविहार चे अध्यक्ष जगदीशजी साखरे, प्राचार्य डॉक्टर भालचंद्र कराड, एचडीएफसी बँकेचे सहाय्यक मॅनेजर नवनाथ सोनटक्के, न्यूलाइफ ब्लड बँकेचे डॉक्टर नाटकर साहेब व त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा उपप्राचार्य डॉक्टर गजानन होन्ना उपप्राचार्य तथा कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक युवराज मुळये, प्राध्यापिका डॉक्टर छाया कोदरकर, जिल्हा समन्वयक प्राध्यापिका डॉक्टर साधना घडसिंग, प्राध्यापक गंगाधर उषमवार, प्राध्यापक जिजाराम बागल, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिका तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉक्टर भालचंद्र कराड यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज मुळ्ये यांनी केले तर आभार चिरंजीव चैतन्य नरसाळे यांनी मानले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी रक्तदान करून या महादानात भरभरून असा सक्रिय सहभाग नोंदवला.


