आंतरराष्ट्रीय महिला दिवस कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रेमनंदा घडसिंग, सोबत महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभयजी कोकड, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गजानन होन्ना, प्रा. युवराज मुळये, प्रा. डॉ. प्रेम राठोड प्राध्यापक व कर्मचारी.
जबूत भवितव्यासाठी स्त्रीपुरुष समानता आवश्यक:- डॉ. प्रेमनंदा घडसिंग
माजलगाव:- श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्री. अभयजी कोकड प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य डॉ. गजानन होंन्ना,प्रा.युवराज मुळये, प्रा.संतोष लिबकर होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून
प्रा. प्रेमनंदा घडसिंग म्हणाल्या की,नारीची पूजा जेथे होते तेथे देवतेचा सहवास असतो.कामगार महिलांनी हक्क प्राप्त करून घेण्यासाठी पाश्चिमात्य देशात मोठा लढा उभारला व यशस्वी केला.मजबूत भवितव्यासाठी स्त्री पुरुष समानता आवश्यक आहे.आज प्रगती झाली तरी स्त्रीला दुय्ययम स्थान दिले जाते. कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास सांगून स्त्री ही शक्तीपीठ आहे.प्रत्येक स्त्रीने स्वतःचे स्वरक्षण स्वतः करावे.असे डॉ. प्रेमनंदा घडसिंग म्हणाल्या. अध्यक्षीय समारोप प्रसंगी अभयजी कोकड म्हणाले की,वर्तमान काळातील स्त्री ही आधुनिक विचाराने प्रभावित आहे.वेगवेगळ्या क्षेत्रात ती यशस्वीपणे कार्य करत आहे.स्त्रीचा सन्मान स्त्रीने केला पाहिजे.आत्मसन्मान घरापासून स्त्रीचा झाला पाहिजे.ज्या राष्ट्रातील स्त्री सक्षम आहे ते राष्ट्र सक्षम होईल.असे प्रतिपादन अभयजी कोकड यांनी केले.प्रा. प्रिती कळसने यांनी प्रास्ताविकात म्हटले की स्त्री म्हणजे वात्सल्य,मांगल्य होय. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री खंबीरपणे उभी असते.जागतिक महिलादिनाचे महत्व सांगून उज्वल भवितव्यासाठी स्त्रीपुरुष समानता आवश्यक आहे असे प्रा प्रिती कळसने म्हणाल्या.
याप्रसंगी पद्य डॉ. रमेश गटकळ यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.प्रतिभा जाधव तर आभार डॉ. सुनील पाटील यांनी केले यावेळी प्राध्यापक विध्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर लगेचच माजलगाव येथील नगर पालिकेतील महिला कर्मचारी व सफाई कर्मचारी तसेच पंचायत समिती माजलगाव येथील महिला कर्मचारी यांचा महिला दिनाचे औचित्य साधून पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला.पंचायत समिती गट विकास अधिकारी अपस्थित होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होत्या.