री. सिद्धेश्वर महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
माजलगाव प्रतिनिधी दिनांक 27 ऑक्टोबर 2020
येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री. सिद्धेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी आज या सप्ताहाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. भालचंद्र कराड यांच्या हस्ते भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ सर्व महाविद्यालयातील कर्मचारी यांना देऊन करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गजानन होंन्ना प्रा. युवराज मुळये कार्यालयीन अधीक्षक श्री. उत्तरेश्वर आनेवार व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व कार्यालयीन कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते हा कार्यक्रम कोरोना विषयक नियमांचे पालन करून घेण्यात आला.