श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
माजलगाव – येथील भा.शि. प्र.संस्थेच्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि विशाखा समितीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक युवा कीर्तनकार साक्षी येवले ,अध्यक्ष प्रा.प्रतिभा जाधव तसेच महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड,प्राचार्य डॉ भालचंद्र कराड,उपप्राचार्य डॉ गजानन होन्ना ,प्रा.युवराज मुळ्ये यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या प्रसंगी साक्षी गायकवाड,रमा घनघाव,नेहा शेख,क्रांती ढगे,नेहा पोतदार, बुशरा शेख या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक साक्षी येवले हिने भाषणात स्त्रियांची महती सांगितली तसेच देशाच्या विकासासाठी महिलांचे योगदान किती महत्त्वाचे आहे ते सांगितले.अध्यक्षीय समारोपात प्रा .प्रतिभा जाधव यांनी महिला दिनाचे मनोगत व्यक्त करतांना मुलींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रमेश गटकळ यांनी केले मान्यवरांचे आभार सना आत्तार हिने मानले.
या कार्यक्रमाचे संयोजन विशाखा समिती प्रमुख डॉ.साधना घडसिंग,प्रा.गंगाधर उषमवार,डॉ.रमेश गटकळ,स्नेहा गायकवाड यांनी केले.