Affiliated Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Accrediated By NAAC Grade 'B'

Science Exhibition

श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन सप्ताह निमित्त “विज्ञान प्रदर्शन “संपन्न :
____________________

माजलगाव – येथील भा.शि. प्र.संस्था अंबाजोगाई संचलित श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन आयोजित केले.
या प्रदर्शनाचे उदघाटन श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा.प्रकाशजी दुगड ,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.अभयजी कोकड, प्राचार्य डॉ.भालचंद्र कराड,उपप्राचार्य डॉ.गजानन होन्ना,प्रा. युवराज मुळ्ये ,प्रा.संतोष लिंबकर यांची उपस्थिती होती.प्रदर्शनाचे उदघाटक मा.प्रकाशजी दुगड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की,विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प कौतुकास्पद आहेत.याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी जिज्ञासा बाळगत संशोधक वृत्त्ती जोपासावी.
महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष मा.अभयजी कोकड म्हणाले की,विद्यार्थ्यांनी स्वत:च्या प्रयोगशीलतेमध्ये सातत्य ठेवले तर ते समाजाला उपयोगी संशोधन करून देशाला प्रगतीपथावर आणतील.या वेळी डॉ भालचंद्र कराड यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व आणि सप्ताहाची संकल्पना स्पष्ट केली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सीताराम इंगोले, यांनी केले.प्रास्ताविक विज्ञान मंच (Science Forum) चे प्रमुख डॉ.प्रे.म.राठोड यांनी केले.
यावेळी कोरोणाच्या सर्व अटी आणि नियम पालन करून प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शना मध्ये वरिष्ठ विभागातील सहा तर कनिष्ठ विभागाचे आठ असे एकूण चौदा प्रयोगांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. ते खलील प्रमाणे :-
*वरिष्ठ विभाग*
1) *Chemistry* : Organic Shampoo
2) *Mathematics* : Dancing Mathematics
3) Computer Science : Database Management system
4) Physics : Renewable Energy : Sources and Environmental awareness
5) Botany : Givamrut
6) Zoology : Sericulture
*कनिष्ठ विभाग*
7) Physics : Home Made Projector
8) Smoke Absorber
9) Water Level Indicator
10) Biology : During Photosynthesis
11) Oxygen in Evolving as Biproduct
12) Biogas
13) Chemistry : Detection of Presence of carbohydrates, proteins and fats in given food stuff
14) Mathematics : Functions and Their Representations
विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील विज्ञान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन दिवसभर खुले ठेवण्यात आले होते.
शेवटी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संतोष लिमकर यांनी सर्वांचे आभार मानले.