माजलगाव ) प्रतिनिधी
भारतामध्ये अनेक महापुरुषांनी आपले जीवन देशासाठी वाहुन घेतले. मानव जातीच्या कल्याणासाठी सर्व महापुरुषांनी कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारतीय राज्यघटना विश्वात सर्वश्रेष्ठ आहे. असे प्रतिपादन तुकाराम येवले यांनी केले ते श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव येथे रासेयो विभाग व फीडबॅक कमिटी अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती निमित्ताने आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत जोशी तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य डॉ. महेश देशमुख होते.
पुढे बोलताना तुकाराम येवले म्हणाले की आज महामानव प्रत्येक जातीने वाटून घेतले हे दुर्देव आहे. *जगा आणि जगू द्या* हा विचार महावीर यांचा होता. शिक्षणातून सामाजिक परिवर्तन आंबेडकरांनी केले. सर्व धर्माचा अभ्यास करून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. धम्मक्रांती केली. स्वातंत्र्य,समता, बंधुता हे मौलिक तत्व दिले. लोकशीमध्ये मतरुपी मौलिक अधिकार प्रत्येकाला दिला. शिका,संघटित व्हा,आणि संघर्ष करा या मूलमंत्राने देशात सर्वच घटकामध्ये परिवर्तन झाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी सामान्य माणसाचे प्रश्न तसेच आहेत याचा विचार आपण केला पाहिजे असे मत तुकाराम येवले यांनी मांडले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी लक्ष्मीकांत जोशी म्हणाले की,त्याग बंधुभाव आपण महापुरुषकडून घेतले पाहिजे.विचाराची श्रीमंतीने अवघ्या जगात आपण सरस आहोत. महापुरुषांचे विचार आजही दीपस्तंभासरखे आहेत. प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. महेश देशमुख म्हणाले की भारत ही त्यागाची भूमी आहे त्यागी पुरुषांचे विचाराचे वारंवार स्मरण करून विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अहिंसा सत्य ,अपरिग्रह,ब्रहमचर्य हे भगवान महावीर यांचे तत्व महत्वपूर्ण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
1916 मध्ये कोलंबिया विद्यापीठात शिक्षण आणि संशोधन केले. ते ज्ञानपिपासू होते. त्यांनी लेखन,वाचन प्रचंड केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार,कृषिविषयक विचार,विजेसबंधी विचार,शिक्षणासबंधीचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. एकूणच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्राचार्य डॉ. महेश देशमुख यांनी मांडले. स्वागत गीत कु.दिव्या वाघमारे आभार डॉ. गंगाधर उषमवार तर सूत्रसंचालन डॉ. लड्डा कमलकिशोर यांनी केले. तर शांतिमंत्र डॉ गजानन होंन्ना यांनी सांगून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. गजानन होन्ना, प्रा.डॉ. प्रेम राठोड, प्रा. युवराज मुळये तसेच फीडबॅक कमिटीचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर गवते, डॉ. तात्याराम सोंडगे, डॉ.गोरक्षनाथ फसले, प्रा. अशोक होके तसेच सर्व प्राध्यापक ,कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थीनीं उपस्थित होते.